साऊदम्पटन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू आहे. त्याचे संघात असणे भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान ग्लेन मॅकग्राने म्हटले आहे.
मॅकग्रा म्हणाला, "धोनीचा अनुभव आणि त्याची सामन्याची समज उत्कृष्ट आहे. त्याला सर्व माहित असते आणि भारताला याचा नक्की फायदा होईल. धोनीने जसे ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सामने फिनिश केले ते मला आवडले. भारताकडे अनेक गुणवंत खेळाडू आहे. फक्त त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे."
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेटपंडितांनी आपले अंदाज मांडायला सुरुवात केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानेही असाच एक दावा केला आहे.
इंग्लंडमध्ये चालू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत किंवा इंग्लंड विजेतेपद जिंकू शकेल. भारतीय गोलंदाजी मजबूत आहे, त्याच्या जोरावर कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला पुन्हा एकदा विश्वकरंडकावर नाव कोरता येईल, असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे.: