ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : जेव्हा इंग्रज आजोबा भेळ विकतात...पाहा व्हिडिओ

ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला

इंग्रज आजोबा
author img

By

Published : Jun 11, 2019, 10:00 PM IST

लंडन - ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे 'विराट' आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३१६ धावांवर सर्वबाद झाल्याने भारताने मोठा विजय मिळवला. या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

इंग्रज आजोबा भेळ विकताना

गर्दीबरोबर हा सामना आणखी एका गोष्टीमुळे चांगलाच लक्षात राहिला. ती गोष्ट म्हणजे ओव्हल मैदानाबाहेरील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक इंग्रज आजोबा एखाद्या अस्सल भारतीय भेळ-पुरीवाल्याप्रमाणे भेळ-पुरी बनवताना या व्हिडिओत दिसत आहेत. आणि या आजोबांची दखल खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली आहे.

big b amitabh bachchan
या आजोबांची दखल खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली आहे

या इंग्रज आजोबांनी आपण अशी भारतीय स्टाइलची भेळ-पुरी कोलकात्यामध्ये शिकल्याचे सांगितले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.