मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला होता. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 37 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पाही पार केला. या भीमपराक्रमाबद्दल कोहलीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायल लारानेही विराटचे चक्क हिंदीतून कौतुक केले.
लारा म्हणाला, 'विराट इस क्लब में आपका स्वागत है. माझ्या आणि सचिनपेक्षा ३६ डाव कमी खेळत हा विक्रम केलास. विंडीजविरुद्ध सामना जिंकल्याबद्दलही अभिनंदन'
-
इस क्लब में आपका स्वागत है @imVkohli
— Brian Lara (@BrianLara) June 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Amazing that you did it in 3️⃣6️⃣ fewer innings than @sachin_rt and me!
Congrats to team India on the win as well 👍 💯#INDvsWI #viratkohli #20k #record #Cricket #ICCWorldCup2019 pic.twitter.com/AbZgMp0gQZ
">इस क्लब में आपका स्वागत है @imVkohli
— Brian Lara (@BrianLara) June 27, 2019
Amazing that you did it in 3️⃣6️⃣ fewer innings than @sachin_rt and me!
Congrats to team India on the win as well 👍 💯#INDvsWI #viratkohli #20k #record #Cricket #ICCWorldCup2019 pic.twitter.com/AbZgMp0gQZइस क्लब में आपका स्वागत है @imVkohli
— Brian Lara (@BrianLara) June 27, 2019
Amazing that you did it in 3️⃣6️⃣ fewer innings than @sachin_rt and me!
Congrats to team India on the win as well 👍 💯#INDvsWI #viratkohli #20k #record #Cricket #ICCWorldCup2019 pic.twitter.com/AbZgMp0gQZ
विराट हा सर्वात कमी डावात 20 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. विराटने 376 व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 417 डाव खेळताना 20 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. तर हाच टप्पा पूर्ण करण्यासाठी सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा या दिग्गज खेळाडूंना 453 डाव खेळावे लागले होते. तर रिकी पॉटिंगला 464 डाव खेळावे लागले होते.