ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : "अफगाण क्रिकेट बोर्डाने मला जबरदस्तीने बाहेर काढले" - afghanistan cricket board

मोहम्मद शहजादच्या जागी अफगाणिस्तानच्या संघात इकराम अली खिलचा समावेश केला आहे.

मोहम्मद शहजाद
author img

By

Published : Jun 10, 2019, 9:21 PM IST

नवी दिल्ली - दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर फेकला गेलेला अफगाणिस्तान संघाचा स्फोटक फलंदाज मोहम्मद शहजाद याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. फिट असतानाही अनफिट दाखवून संघातून जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप त्याने केला आहे. वर्ल्डकपमधून बाहेर काढल्यामुळे शहजाद ढसाढसा रडल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

mohammad shahzad
शहजादचा ढसाढसा रडल्याचा फोटो व्हायरल झाला आहे

यष्टीरक्षक फलंदाज शहजाद म्हणाला, "माझ्या गुडघ्याची दुखापत जुनी होती आणि त्यातून मी जवळपास फिटसुद्धा झालो होतो. मला थोडीशी विश्रांती घेतल्यावर सर्व ठिक होईल असे, फिजीओने सांगितले होते. पण नेट्समध्ये सराव करत असताना टीम व्यवस्थापकाने अचानक मला बोलावले आणि सांगितले की तू फिट नाहीस. तुला परत जावे लागेल, असे सांगून बोर्डाने मला जबरदस्तीने बाहेर काढले."

विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ तीन सामने खेळला असून सर्वच सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मोहम्मद शहजादच्या जागी अफगाणिस्तानच्या संघात इकराम अली खिलचा समावेश केला आहे.

Intro:Body:

Sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.