नवी दिल्ली - भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने नवदीप सैनीमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचे सांगितले. कसोटी संघात खेळण्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता असते, त्या सर्व बाबी नवदीप सैनीमध्ये असल्याचे जहीर म्हणाला. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना जहीरने सैनीसोबत बुमराहचेही कौतुक केले.
नवदीप सैनीने वेस्ट इंडीज दौऱ्यात एकदिवसीय व टी-२० मालिकेत संघात स्थान मिळवले. तसेच त्याने इंडियन प्रीमीयर लीगसह प्रथम श्रेणीमध्येही चांगले प्रदर्शन केले आहे. सैनीच्या गोलंदाजीमध्ये वेग असून तो योग्य अचूक मारा करु शकतो. यामुळे सैनीकडे कसोटी खेळण्याची क्षमता असल्याचे जहीरचे म्हणणे आहे.
हेही वाचा - टीम इंडियाला जबर धक्का, 'या' हुकमी गोलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार
भारतीय गोलंदाजीविषयी जहीर म्हणाला, 'सध्य स्थितीत भारताची गोलंदाजी धारधार असून गोलंदाजांच्या कामगिरीवर मी खूश आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आउटस्विंग चेंडू तर फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. बुमराहने वेस्ट इंडीज विरुध्दच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. या मालिकेत बुमराहने आउटस्विंगचा अचूक मारा केला. यापूर्वी बुमराह अशा प्रकारे गोलंदाजी करताना दिसला नाही.'
'बुमराहने आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला हवे. जसजसा बुमराहचा अनुभव वाढत जाईल, तशी बुमराहची गोलंदाजी भेदक होत जाईल,' असे भाकितही जहीरने व्यक्त केले.
हेही वाचा - 'लव्ह यू ऋषभ...!' तरुणीच्या 'दिल की बात'वर पंतने काय केले वाचा...