ETV Bharat / sports

युवराजने आपल्या बायोपिकसाठी 'या' अभिनेत्याच्या नावाला दिली पसंती - युवराज सिंग

युवराजने हसत सांगितले, की 'जर असे झाले तर मी स्वत: च ही भूमिका करेन. परंतु असे करणे योग्य ठरणार नाही. कोणाला कोणती भूमिका द्यायची हा निर्णय दिग्दर्शकाच्या हातात असतो. परंतु जर बॉलिवूडमध्ये माझा चरित्रपट तयार होणार असेल, तर मला असे वाटते, की सिद्धांत चतुर्वेदी माझ्या भूमिकेसाठी योग्य पर्याय आहे.'

yuvraj singh says he would to see siddhant chaturvedi in his biopic
युवराजने आपल्या बायोपिकसाठी 'या' अभिनेत्याच्या नावाला दिली पसंती
author img

By

Published : Mar 17, 2020, 9:22 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये हल्ली बायोपिक चित्रपटाची क्रेझ वाढली आहे. आतापर्यंत धोनी, सचिन, मेरी कोम यांसारख्या खेळाडूंवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर कपिल देव आणि सायना नेहवाल यांच्यावर चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला प्रश्न विचारण्यात होता, की स्वत: च्या चरित्रपटात कोणत्या अभिनेत्याला पहायला आवडेल? यावेळी युवराजने गंमतीशीर उत्तर दिले.

युवराजने हसत सांगितले, की 'जर असे झाले तर मी स्वत: च ही भूमिका करेन. परंतु असे करणे योग्य ठरणार नाही. कोणाला कोणती भूमिका द्यायची हा निर्णय दिग्दर्शकाच्या हातात असतो. परंतु जर बॉलिवूडमध्ये माझा चरित्रपट तयार होणार असेल, तर मला असे वाटते, की सिद्धांत चतुर्वेदी माझ्या भूमिकेसाठी योग्य आहे.'

सिद्धांत गली बॉय चित्रपटापासून चर्चेत आला होता. या चित्रपटात जेवढी प्रशंसा रणवीर सिंगची करण्यात आली तितकीच ओळख सिद्धांतला मिळाली. सिद्धांत सध्या दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासोबत काम करत असून यात तो दीपिका पादुकोन आणि अनन्या पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा रिलेशनशीप ड्रामा आहे.

हेही वाचा - VIDEO : प्रात्यक्षिकाद्वारे सचिनने सांगितला कोरोनावरचा उपाय

हेही वाचा - "द्रविड आणि लक्ष्मणसारख्या खेळाडूंना हवी तशी ओळख मिळाली नाही"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.