ETV Bharat / sports

हुश्श...! युवराज सिंगला मिळाला मोठा दिलासा - युवराज सिंगला दिलासा न्यूज

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउन काळात युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता.

Yuvraj Singh gets interim relief
हुश्श...! युवरायुवराज सिंगला मिळाला दिलासा
author img

By

Published : Feb 26, 2021, 12:08 PM IST

चंदीगड - भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. युवराज सिंगविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मागील वर्षी रोहित शर्माशी 'इन्स्टाग्राम'वर साधलेल्या संवादादरम्यान युवराजने मस्तीच्या भरात फिरकीपटू युझवेंद्र चहलला उद्देशून जातीवाचक शब्द उच्चारले होते. यासंदर्भात हिसारच्या हांसी पोलीस स्टेशनमध्ये ही एफआयआर नोंदविण्यात आली होती. मात्र, त्याने एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने हरयाणा सरकार आणि तक्रारदाराला नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ वकील पुनीत बाली यांनी युवराजच्या वतीने बाजू मांडली.

काय आहे प्रकरण -

युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता.

यानंतर युवीने आपली बाजू मांडली. ''माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचे कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो. मला जातीवाचक टीका टिप्पणी करण्यात काहीही रस नाही. रोहितशी झालेल्या त्या संवादादरम्यान माझ्या शब्दांचा उलट अर्थ काढण्यात आला. परंतु माझ्या या कृत्यामुळे चहलव्यतिरिक्त अन्य कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो'', असे युवराजने ट्विट केले होते.

युवराज आणि क्रिकेट -

१२ डिसेंबर १९८१ रोजी चंदीगढमध्ये युवराजचा जन्म झाला. टी-२० क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम युवीच्या नावे आहे. युवीने टी-२० क्रिकेटमध्ये तर आपली छाप सोडलीच पण त्याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ८७०१, १९००, ११७७ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.