मुंबई - भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा पाचवा आणि अंतिम टी-२० सामनाही भारताने ७ धावांनी जिंकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत 'व्हॉईट वॉश' दिला. भारताने प्रथमच न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगनेही संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराज सिंगने ट्विट करून भारतीय संघाचे कौतुक केले. ट्विटमध्ये तो म्हणाला, अविश्वसनीय खेळी.. टीम इंडियाने सर्वोत्तम प्रदर्शन केले.. ५-० ही कामगिरी केवळ अविश्वसनीय आहे.. अभिनंदन टीम इंडिया पार्टी तो बनती है...
-
Unbelievable stuff !!! Great performance team india 🇮🇳 5 , 0 away is just incredible ☝🏼 congratulations boys party 🥳 to banti hai 💃🏼
— yuvraj singh (@YUVSTRONG12) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Unbelievable stuff !!! Great performance team india 🇮🇳 5 , 0 away is just incredible ☝🏼 congratulations boys party 🥳 to banti hai 💃🏼
— yuvraj singh (@YUVSTRONG12) February 2, 2020Unbelievable stuff !!! Great performance team india 🇮🇳 5 , 0 away is just incredible ☝🏼 congratulations boys party 🥳 to banti hai 💃🏼
— yuvraj singh (@YUVSTRONG12) February 2, 2020
हेही वाचा - IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सह भारताचा ५-० ने ऐतिहासिक मालिका विजय
आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १६३ धावा केल्या होत्या. पण न्यूझीलंडला संघ २० षटकात ९ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय संघाने मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवून दिला नाही.
हेही वाचा - पाकिस्तानचा खेळाडू म्हणतो, 'भारताशी सामना म्हणजे...'