ETV Bharat / sports

यशस्वी जयस्वाल 'हिट' तर, अर्जुन तेंडुलकर 'फ्लॉप'

author img

By

Published : Feb 23, 2020, 7:37 PM IST

वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि पुडुचेरी यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वीने शानदार शतक ठोकले. त्याने २४३ चेंडूत १८५ धावा केल्या. तर, अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात ४५ चेंडूत फक्त ६ धावा केल्या.

yashasvi jaiswal hit a century in ck nayudu tournament 2020
यशस्वी जयस्वाल 'हिट' तर, अर्जुन तेंडुलकर 'फ्लॉप'

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या यशस्वी जयस्वालने आपला जलवा दाखवत सर्वांना चकित केले. आपला 'जादुई' फॉर्म कायम राखत यशस्वीने २३ वर्षांखालील सी. के. नायडू स्पर्धेत मुंबईकडून शतक ठोकले आहे.

हेही वाचा - काय सांगता!...८३ वर्षाच्या वेटलिफ्टरवर डोपिंगप्रकरणी बंदी

वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि पुडुचेरी यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वीने शानदार शतक ठोकले. त्याने २४३ चेंडूत १८५ धावा केल्या. यशस्वीने आपल्या खेळीत १९ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याला मुंबईचा कर्णधार हार्दिक जितेंद्र तमोरेची (८३) उत्तम साथ लाभली.

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात पुडुचेरीने २०९ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मुंबईने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावा केल्या आहेत. मुंबईकडे ११५ धावांची आघाडी आहे.

अर्जुन तेंडुलकर 'फ्लॉप' -

मुंबईकडून खेळणाऱया अर्जुन तेंडुलकरने पुडुचेरीविरूद्धच्या सामन्यात ४५ चेंडूत फक्त ६ धावा केल्या. शिवाय त्याला गोलंदाजीतही एकच गडी बाद करता आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.