मुंबई - ऋषभ पंत भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक म्हणून संघात आल्याने ऋद्धिमान साहा याची जागा धोक्यात आले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ऋद्धिमान साहाने पंत विषयी प्रतिक्रिया दिली आहे. साहा म्हणाला की, पंतशी माझी कोणतीच स्पर्धा नाही.
भारताचा सर्वोत्तम कसोटी यष्टीरक्षक असलेला साहा गेल्या १ वर्षापासून खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. साहाने नुकतेच सैयद अली मुश्ताक टी-२० ट्रॉफीत पुनरागमन केले आहे. त्याने मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या ११ सामन्यात ३०६ धावा केल्या आहेत.
पंतविषयी साहा बोलताना म्हणाला की, पंतच्या संघात येण्याने मला असुरक्षित वाटत नाही. मी दुखापतीमुळे बाहेर असल्याने पंतला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले. भारतीय संघात पुनरागमन करणे हेच माझे लक्ष्य आहे. माझा तो प्रतिस्पर्धी नाही असेही साहा म्हणाला.
ऋषभ पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजीत शानदार कामगिरी करत शतके ठोकली आहेत. त्यानंतर पंतमुळे साहाची जागा धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.