दुबई - इंग्लंडमध्ये पार पडलेला क्रिकेट कुंभमेळा म्हणजे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०१९. ही सगळ्यात जास्त लाईव्ह पहिला गेलेली स्पर्धा ठरली आहे. आयसीसीने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे थेट प्रसारण एकूण ६० कोटी लोकांनी पाहिले आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहण्यातही भारतीयांनीच बाजी मारली आहे.
हेही वाचा - टी-२० विश्वकरंडकपूर्वी विराटचा खेळाडूंना इशारा, ५ सामन्यात स्वतःला सिध्द करा अन्यथा...
आयसीसीच्या इतिहासात प्रथमच २५ प्रसारण भागीदारांनी २०० हून अधिक क्षेत्रांमध्ये २० हजारहून अधिक तास या विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात थेट प्रसारण करण्यात आले होते.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील सगळ्या सामन्यांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वात जास्त पाहिला गेला. हा सामना २७.३० कोटी लोकांनी टिव्हीवर पाहिला. तर, ५ कोटी लोकांनी हा सामना डिजीटल मंचावर पाहिला.
हेही वाचा - विश्वविक्रम! भारतासह बलाढ्य संघांना जे जमलं नाही, ते अफगाणिस्ताननं करुन दाखवलं
भारताचा अजून एक सामना जास्त पाहिला गेला. तो सामना होता न्यूझीलंड विरुध्दचा उपांत्य फेरीचा. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झालेला हा सामना तब्बल २.५३ कोटी लोकांनी पाहिला. दरम्यान, २०१९ विश्वकरंडक स्पर्धेत २०१५ च्या तुलनेत तब्बल ३८ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे आयसीसीने सांगितले.