ETV Bharat / sports

Women's T20 Challenge: अटीतटीच्या सामन्यात सुपरनोव्हाजचा ट्रेलब्लेझर्सवर २ धावांनी विजय

अटातटीच्या सामन्यात सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सचा अवघ्या 2 धावांनी पराभव करत, महिलांच्या चॅलेंजर्स टी-20 स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Women's T20 Challenge: Supernovas Beat Trailblazers By 2 Runs
Women's T20 Challenge: अटीतटीच्या सामन्यात सुपरनोव्हाजचा ट्रेलब्लेझर्सवर २ धावांनी विजय
author img

By

Published : Nov 8, 2020, 5:28 PM IST

शारजाह - अटातटीच्या सामन्यात सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सचा अवघ्या 2 धावांनी पराभव करत, महिलांच्या चॅलेंजर्स टी-20 स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ट्रेलब्लेझर्सच्या दीप्ती शर्मा आणि हरलीन देओल यांनी कडवी झुंज दिली. पण सुपरनोव्हाजने राधा यादव व शकिरा सेलमन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यांतील पराभवानंतरही ट्रेलब्लेझर्सनेही अंतिम फेरी गाठली. उभय संघात अंतिम सामना सोमवारी होणार आहे.

हरमनप्रीतने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा चामरी अटापटूचे वादळी अर्धशतक तसेच प्रिया पुनिया व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 6 गडी गमावून 146 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल ट्रेलब्लेझर्सची सुरूवात चांगली झाली. डेनद्रा डॉटिन आणि स्मृती मंधाना या जोडीने 6.3 षटकात 44 धावांची सलामी दिली. ही जोडीने सेलमनने डॉटिनला (27) बाद करून फोडली. यानंतर रिचा घोष अवघ्या 4 धावा काढून बाद झाली. स्मृतीने दीप्तीशर्मासह ट्रेलब्लेझर्सचा डाव सावरला. ही जोडी अंजू पाटीलने स्मृतीला (33) बाद करत फोडली. स्मृती बाद झाल्यानंतर हेमलता देखील बाद झाली. तेव्हा दीप्तीने हरलीन सोबत कडवी झुंज दिली. पण ते विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावांची गरज होती. तेव्हा गोलंदाज राधा यादवने १ धावा दिली.

हेही वाचा - IPL चा चौदावा हंगाम कधी आणि कुठे होणार? गांगुलींनी दिली माहिती

हेही वाचा - 'एकवेळ कपिल देव, श्रीनाथ, प्रभाकर यांचा सामना करेन, पण बुमराह नको रे बाबा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.