नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लेनिंगने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान १३ शतके करण्याचा विक्रम नोंदविला आहे. लेनिंगने केवळ ७६ डावांमध्ये हा पराक्रम करत विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि स्टीव स्मिथ यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले.
हेही वाचा - ..असा विक्रम करणारा राशिद खान पहिलाच कर्णधार
गुरुवारी अँटिगा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. हे तिच्या कारकीर्दीचे १३ वे शतक होते. महिला आणि पुरुष क्रिकेट संघामध्ये कोणत्याही वेगवान खेळाडूने या वेगाने एकदिवसीय सामन्यात १३ शतके ठोकली नव्हती. लेनिंगने दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमलाला मागे सोडले, त्याने ८३ डावांमध्ये १३ एकदिवसीय शतके ठोकली होती. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने १३ शतके ठोकण्यासाठी ८६ डावांचा सामना केला होता. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा विक्रम लेनिंगच्या नावावर आहे.
-
CENTURY! Meg Lanning's 13th ODI ton and she gets there with a six.
— cricket.com.au (@cricketcomau) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What a player! pic.twitter.com/B7JV3lbBtY
">CENTURY! Meg Lanning's 13th ODI ton and she gets there with a six.
— cricket.com.au (@cricketcomau) September 5, 2019
What a player! pic.twitter.com/B7JV3lbBtYCENTURY! Meg Lanning's 13th ODI ton and she gets there with a six.
— cricket.com.au (@cricketcomau) September 5, 2019
What a player! pic.twitter.com/B7JV3lbBtY
हेही वाचा - पहिल्या जेतेपदावेळी 'तिचा' जन्मही झाला नव्हता, तिनं आज सेरेनाला चारली धूळ!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने लेनिंग व एलिसा हीली (१२२) यांच्या शतकी खेळीसह विंडीजला १७८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावून ३०८ धावा केल्यावर विंडीजच्या संघाला ३७.३ षटकांत १३० धावांनी गुंडाळले.
हेलीने कर्णधार लेनिंगबरोबर दुसर्या विकेटसाठी २२५ धावांची भागीदारी केली. लेनिंगने १२ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या.