एंटीगा - डेरेन ब्राव्होच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. या विजयासह विंडीजने श्रीलंकेला ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केलं आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ६ बाद २७४ धावा केल्या होत्या. विंडीजने हे लक्ष्य ४८.३ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. डेरेन ब्रोव्होने १३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली. तर केरॉन पोलार्डने ४२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५३ धावांची खेळी करत विजय मिळवून दिला.
डेरेन ब्राव्होला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर शाय होप मालिकावीर ठरला. आता उभय संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. २१ मार्चपासून या मालिकेला सुरूवात होईल.
हेही वाचा - IPL गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचे टी-२० पदार्पण
हेही वाचा - वचपा काढला! इंग्लंडला दणका; मालिकेत १-१ बरोबरी, दुसऱ्या टी-२०त भारताचा ७ गडी राखून विजय