ETV Bharat / sports

धोनीच्या पुनरागमनाविषयी रवी शास्त्रीचा मोठा खुलासा

विश्वकरंडक स्पर्धेनंतर मी धोनीला भेटलो नाही. पण त्याला संघात पुनरागमन करावयाचे असल्यास, त्याने प्रथम सराव करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर पाहूया परिस्थितीनुसार काय ठरते ते. तसेच त्याने निवडकर्त्यांना पुनरागमनाविषयी चर्चा करणे, आवश्यक असल्याचेही शास्त्री यांनी सांगितलं.

धोनीच्या पुनरागमनाविषयी रवी शास्त्रीचा मोठा खुलासा
author img

By

Published : Oct 9, 2019, 8:26 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून जवळपास ३ महिन्यांपासून लांब आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनीने कोणताही सामना खेळला नाही. विश्वकरंडकानंतर धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चांना ऊत आला होता. मात्र, त्या चर्चा निरर्थक ठरल्या, धोनी डिंसेबरमध्ये वेस्ट इंडीज विरुध्द होणाऱ्या टी-२० मालिकेत पुनरागमन करणार, असे बोलले जात आहे. धोनीच्या पुनरागमन विषयावर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

रवी शास्त्री यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्यांनी धोनीच्या संघात पुनरागमनाविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, 'संघात पुनरागमन करण्याविषयी धोनीनेच निर्णय घ्यायचा आहे. पण, भारतीय क्रिकेटविश्वात धोनीची गणना महान खेळाडू अशी केली जाईल.'

विश्वकरंडक स्पर्धेनंतर मी धोनीला भेटलो नाही. पण त्याला संघात पुनरागमन करावयाचे असल्यास, त्याने प्रथम सराव करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर पाहूया परिस्थितीनुसार काय ठरत ते. तसेच त्याने निवडकर्त्यांना पुनरागमनाविषयी चर्चा करणे, आवश्यक असल्याचेही शास्त्री यांनी सांगितलं.

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या न्यूझीलंड विरुध्दच्या उपांत्य सामन्यातील पराभवानंतर क्रिकेटपासून लांब आहे. विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीज आणि आता आफ्रिकाविरुध्द मालिका खेळत आहे. मात्र, दोन्ही मालिकेतून धोनीने माघार घेतलेली आहे. धोनीने टीम इंडियाला २००७ मध्ये टी-२० विश्वकरंडक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून दिला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.