ETV Bharat / sports

विंडीजचा मालिकाविजय, तिसऱ्या टी-२० सामन्यात लंकेला हरवले - वेस्ट इंडिज वि. श्रीलंका लेटेस्ट न्यूज

श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मधल्या फळीत अनुभवी दिनेश चंडिमलने ५४ आणि एशेन बंदाराने ४४ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. फॅबियन एलनने केवळ १३ धावा देऊन १ बळी घेतला.

वेस्ट इंडिज वि. श्रीलंका लेटेस्ट न्यूज
वेस्ट इंडिज वि. श्रीलंका लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Mar 8, 2021, 10:14 AM IST

नवी दिल्ली - अँटिगामध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेला ३ गडी राखून पराभूत केले. यासह विंडीजने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या श्रीलंका संघाने ४ गडी गमावत १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १९ षटकांत ७ गडी गमावून हा सामना जिंकला. फॅबियन एलनला अष्टपैलू कामगिरीसाठी (१ बळी आणि नाबाद २१ धावा ) सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मधल्या फळीत अनुभवी दिनेश चंडिमलने ५४ आणि एशेन बंदाराने ४४ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. फॅबियन एलनने केवळ १३ धावा देऊन १ बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजकडून सलामीवीरांनी चांगली खेळी खेळली. लेंडल सिमन्सने २६ आणि एव्हिन लुईसने २१धावा केल्या. मधल्या फळीत ख्रिस गेलला केवळ १३ धावा करता आल्या आणि कर्णधार कायरन पोलार्ड खाते उघडण्यास असमर्थ ठरला. यानंतर निकोलस पूरनने २३ धावांची खेळी केली. अखेर फॅबियन २१ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून लक्षण संदाकनने ३ बळी घेतले.

हेही वाचा - त्याग असावा तर असा, ऑलिम्पिकसाठी भालाफेकपटूने सोडली 'ही' गोष्ट!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.