नॉटिंगहॅम - विश्वकरंडक स्पर्धेत ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ७ गडी राखून मिळवला विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १०५ धावांमध्ये गारद झाला.
पाकने विजयासाठी दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १३.४ षटकांमध्ये ३ गडी गमावत विजय साजरा केला. वेस्ट इंडिजसाठी ख्रिस गेलने सर्वाधिक ३४ चेंडूत ५० धावांची खेळी केली. गेलच्या या अर्धशतकी खेळीत ६ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता.
वेस्ट इंडिजसाठी ओश्ने थॉमसने सर्वाधिक ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ तर शेल्डन कोट्रेलने १ विकेट घेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकच्या फक्त चार फलंदाजांना २ अंकी धावसंख्या करता आली. त्यात फखर झमान (२२), बाबर आझम (२२), मोहम्मद हफीज (१६) आणि वहाब रियाज (१८) यांचा समावेश आहे.
या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेल्या मोहम्मद आमिरने पाकसाठी ३ विकेट घेतले.
अशी होती दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्ह
- पाकिस्तान - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, मोहम्मद आमिर, शादाब खान, वहाब रियाज.
- वेस्ट इंडिज - जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, आंद्रे रसेल, शेल्डन कॉटरेल, निकोलस पूरन, ऍशले नर्स, शिमरॉन हेटमायर, शाय होप, ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो,