बार्बाडोस - कोरोनामुळे आर्थिक नुकसानाचा फटका विंडीजच्या क्रिकेटपटूंना बसला आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे जानेवारीपासून विंडीजचे क्रिकेटपटू सामन्याच्या मानधनापासून वंचित आहेत. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या क्रिकेटपटूंना आयर्लंड आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंका दौर्यासाठी सामना शुल्क दिले गेलेले नाही.
इतकेच नव्हे तर, महिला क्रिकेटपटूंना यंदा ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या चार सामन्यांचे मानधनही देण्यात आलेले नाही. विंडीज क्रिकेट मंडळ (सीडब्ल्यूआई) आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
डब्ल्यूआयपीएचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह म्हणाले, की सध्या वेस्ट इंडीज मंडळ आर्थिकदृष्ट्या कठीण अवस्थेतून जात आहे. आम्ही या खेळाडूंना पैसे देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व करारातील खेळाडूंना त्यांचे वेतन व भत्ते प्राप्त झाले आहेत. काही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम आणि सामना शुल्क प्राप्त झाले आहे. अजूनही काही खेळाडूंचे पैसे बाकी आहेत आणि आम्ही ते प्राथमिकतेनुसार देतो. डब्ल्यूआयपीएचे सचिव वेन लुईस म्हणाले, की खेळाडूंची रक्कम दिली गेली होती पण सामन्याचे शुल्क दिले गेले नाही.