ETV Bharat / sports

AUS VS IND : पराभवावर टीम पेन म्हणाला, भारतीय संघाने आम्हाला... - भारत वि. ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी न्यूज

भारतीय संघाला विजयाचे श्रेय दिले पाहिजे. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर आम्हाला चूक करण्यास भाग पाडले, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने सांगितले.

We played poorly, disappointed with defeat says Tim Paine
AUS VS IND : पराभवावर टीम पेन म्हणाला, भारतीय संघाने आम्हाला...
author img

By

Published : Dec 29, 2020, 6:48 PM IST

मेलबर्न - पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून धूळ चारली. पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने, संघाच्या खराब प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली.

सामना संपल्यानंतर टीम पेन म्हणाला की, आम्ही खराब खेळलो. सामन्यातील महत्वाच्या क्षणी आमचे प्रदर्शन निराशजनक होते. भारतीय संघाला या विजयाचे श्रेय दिले पाहिजे. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर आम्हाला चूक करण्यास भाग पाडले. तुम्ही एका तुल्यबळ संघासोबत खेळताना अशा चूका करू शकत नाही. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.

दरम्यान, टीम पेनने युवा खेळाडू कॅमरुन ग्रीन याचे कौतूक केले. तो म्हणाला की, ग्रीन याने धैर्य दाखवत भारतीय गोलंदाजांचा सामना केला. यावरुन त्याची गुणवत्ता दिसते. ती सामन्यागणिक वाढत जाईल.

भारताची मालिकेत बरोबरी

ऑस्ट्रेलियाने अ‌ॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघ हा पराभव विसरून नव्या दमाने, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात भारतीय संघाने तिन्ही आघाड्यावर दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत सामना ८ गडी राखून जिंकला आणि ४ सामन्याचा मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

हेही वाचा - भारताच्या विजयाकडे एक उदाहरण म्हणून पहिलं जाईल - रवी शास्त्री

हेही वाचा - 'वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.