ETV Bharat / sports

VIDEO : विजयी जल्लोष करताना, प्रियकरानं केलं 'प्रपोज'..पुढं काय झालं वाचा - महिला बिग बॅश लीग २०१९

ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू अमांडाला तिचा प्रियकर टेलर याने भरमैदानात अंगठी देऊन लग्नासाठी विचारणा केली. तेव्हा अमांडानेही टेलरच्या प्रेमाचा स्वीकार करत लग्नासाठी होकार दिला. यावेळी तिच्या सहकाऱ्यांनी तसेच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

VIDEO : महिला क्रिकेटर विजयी जल्लोष करताना, प्रियकरानं केलं 'प्रपोज'..पुढं काय झालं वाचा
author img

By

Published : Oct 20, 2019, 11:24 AM IST

Updated : Oct 20, 2019, 4:46 PM IST

मेलबर्न - महिला बिग बॅश लीगमध्ये अॅडिलेड स्ट्राइकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स या संघात झालेल्या सामन्यात अॅडिलेड संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. सामन्यानंतर खेळाडूंनी मैदानात विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली. तेव्हा एका महिला क्रिकेटपटूला तिच्या प्रियकराने भरमैदानात प्रपोज केले. या क्षणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू अमांडाला तिचा प्रियकर टेलर याने भरमैदानात अंगठी देऊन लग्नासाठी विचारणा केली. तेव्हा अमांडानेही टेलरच्या प्रेमाचा स्वीकार करत लग्नासाठी होकार दिला. यावेळी तिच्या सहकाऱ्यांनी तसेच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

याविषयी बोलताना अमांडा म्हणाली की, जेव्हा मी टेलरला मैदानात पहिले तेव्हा मला वाटलं की तो फोटो घेण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, तो मला अशा प्रकारे प्रपोज करेल याची पुसटशी कल्पना नव्हती. त्याने प्रपोज केल्यानंतर मी अचंबित झाले. पण मी खूप खुश आहे.'

दरम्यान, २२ वर्षीय अमांडाने ऑस्ट्रेलिया संघात २०१६ मध्ये पदार्पण केले आहे. तिने ऑस्ट्रेलियाकडून १ कसोटी ८ टी-२० आणि १२ एकदिवसीय सामने खेळली आहेत.

हेही वाचा - India Vs South Africa ३rd Test : रोहित दीडशेपार, टीम इंडिया मोठ्या आघाडीकडे

हेही वाचा - गंभीरची 'दर्यादिली', मृत्यूशी झुंज देत असलेल्या पाकिस्तानच्या चिमुकलीची केली मदत

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.