मुंबई - कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात सर्व खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्ठपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचसह घरीच वेळ घालवत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओत हार्दिक हिंदीमध्ये नताशाला विचारतो, 'बेबी मैं क्या हूँ तेरा?', यावर नताशा हिंदीमध्ये उत्तर देते. नताशा त्याला 'जिगर का तुकडा', असे उत्तर देते. तिच्या या उत्तरावर दोघेही हसतात. पण नताशा सर्बियन असल्याने तिला जिगर का तुकडा या शब्दांचे उच्चार व्यवस्थित करता येत नाहीये.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, हार्दिकने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशासोबत साखरपुडा केला आहे. या दोघांनी एका क्रूझवर समुद्रात साखरपुडा केला आहे. त्याच्या सोबत काही मित्र होते. साखरपुड्यानंतर दोघेही एकत्र राहत आहेत. नताशा सर्बियन मॉडेल आहे. तिने २०१२मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. बिग बॉसच्या आठव्या पर्वातून तिला खरी ओळख मिळाली.
हेही वाचा - IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, BCCI सूत्रांची माहिती
हेही वाचा - गावस्कर म्हणतात, "लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते, पण भारत-पाक मालिका नाही"