सिडनी - क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो. तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार गोलंदाजीने गमावतो. काही वेळा तर क्षेत्ररक्षक एखादा सोपा झेल सोडतो. तर कधी खेळाडू एकादा असा झेल पकडतो की, सगळेच आवाक होतात. नुकताच असाच एक झेल बिग बॅश लिगमध्ये पाहायला मिळाला.
बिग बॅश लिगमध्ये इंग्लंडचा ख्रिस जॉर्डनने एक अप्रतिम झेल घेतला. पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगॅडेस यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पर्थ स्कॉचर्सचा ख्रिस जॉर्डनने अफलातून झेल घेतला. याचा एक व्हिडिओ बिग बॅशने आपल्या सोशल अकाऊंवरुन शेअर केला आहे.
-
Chris Jordan, ARE YOU KIDDING ME!!! #BBL09 pic.twitter.com/kZZf2yMWxF
— KFC Big Bash League (@BBL) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chris Jordan, ARE YOU KIDDING ME!!! #BBL09 pic.twitter.com/kZZf2yMWxF
— KFC Big Bash League (@BBL) December 21, 2019Chris Jordan, ARE YOU KIDDING ME!!! #BBL09 pic.twitter.com/kZZf2yMWxF
— KFC Big Bash League (@BBL) December 21, 2019
सामन्याचे १८ वे षटक फवाद अहेमदने टाकले. त्याच्या पाचव्या चेंडूवर रेनेगॅडेसचा फलंदाज डॅनिएल ख्रिस्टीयनने जोरदार फटका लगावला. तेव्हा सीमारेषेवर उभा असलेल्या जॉर्डनने अफलातून झेल घेत सर्वांची वाहवाह मिळवली.
पर्थ स्कॉचर्स यांनी प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श (५६) आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्टच्या (५१) अर्धशतकी खेळींच्या जोरावर २० षटकात ७ बाद १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल रेनेगॅडेसचा संघ २० षटकात ६ बाद १८५ धावा करु शकला. स्काचर्सनी हा सामना ११ धावांनी जिंकला. दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबनं तीन कोटींत इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला आपल्या ताफ्याल दाखल करून घेतले.
हेही वाचा - 'माझं बलस्थान आणि गेम चेंजर...', हिटमॅन रोहितने पत्नी रितिकाला केलं बर्थ-डे विश
हेही वाचा - ९४ हजार कोटी रुपयांचा 'वारसदार' असलेल्या आर्यमाननं क्रिकेटमधून घेतला ब्रेक!