मुंबई - यंदाच्या विजय हजारे करंडकासाठी अनुभवी फलंदाज वसीम जाफरकडे विदर्भ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. फैज फजलच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
![wasim jaffer become captain of vidarbha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4453960_thum_1609newsroom_1568615956_78.jpg)
हेही वाचा - बिलियर्ड्स : पंकज अडवाणीने पटकावले २२ वे विश्व विजेतेपद
फजल दुखापतीमधून बाहेर पडल्यानंतर तो विजय हजारे करंडकाच्या उर्वरित सामन्यांसाठी नेतृत्व करणार आहे .विदर्भ क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी १५ जणांच्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान दिले आहे. फजलने आपल्या कर्णधारपदाच्या काळात विदर्भ संघाला लागोपाठ दोनवेळा रणजीचे विजेतेपद मिळवून दिले आहे.
दुलीप करंडकाच्या वेळी फजलला दुखापत झाली होती. वीसीएचे अध्यक्ष आनंद जयस्वाल म्हणाले, 'फजलवर उपचार सुरु आहेत. सध्या तो संघासाठी तंदुरुस्त नाही, त्यामुळे आम्ही जाफरला कार्यकारी कर्णधार म्हणून नेमले आहे.' २४ सप्टेंबरला विदर्भचा संघ आपला पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळणार आहे.
विदर्भ संघ :
वसीम जाफर (कर्णधार), आरए संजय, अथर्व ताएडे, गणेश सतीश, रुषभ राठौर, अपूर्व वानखेडे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षय वाडकर, अक्षय वाखारे, अक्षय कारनेवार, आदित्य सरवटे, उमेश यादव, यश ठाकुर, दर्शन नालकांडे आणि श्रीकांत वाघ.