लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने सोशल मीडियाला रामराम करत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण देताना वकारने त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. वकारच्या अकाऊंटवरून एका अश्लील व्हिडीओला 'लाइक' करण्यात आले होते. त्यानंतर वकारने यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला.
वकार म्हणाला, ''आज मी सकाळी उठलो तेव्हा मला दिसले, की कोणीतरी माझे अकाऊंट हॅक केले होते. या अकाऊंटवरून खूप आक्षेपार्ह पोस्टला लाइक केले गेले. ही माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.'' ही आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.
- — Waqar Younis (@waqyounis99) May 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Waqar Younis (@waqyounis99) May 29, 2020
">— Waqar Younis (@waqyounis99) May 29, 2020
तो म्हणाला, ''मी आणि माझ्या कुटुंबासाठीही हे खूप वेदनादायक आहे. लोकांशी संवाद साधणे आणि त्यांच्याशी बोलणे शक्य होईल, असा विचार करून मी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण दुर्दैवाने, या माणसाने सर्व काही खराब केले आहे. हो, या हॅकरने हे प्रथमच केले नाही. माझे खाते तीन ते चार वेळा हॅक झाले आहे. हा माणूस थांबेल असे मला वाटत नाही. म्हणून मी यापुढे सोशल मीडियावर येणार नाही. माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. यापुढे तुम्ही मला सोशल मीडियावर पाहणार नाहीत. यामुळे कुणाला दुखावले असेल, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.''