ETV Bharat / sports

कैफचे क्षेत्ररक्षण इतर खेळाडूंसाठी 'बेंचमार्क', लक्ष्मणने केले कौतुक - laxman and kaif latest news

लक्ष्मणने ट्विटरवर कैफचा एक फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "भारताच्या तळागाळातील संरचनेचा माणूस. कैफने उत्तर प्रदेशातील संपूर्ण पिढीला असुरक्षिततेची भावना सोडून उच्च पातळीवर खेळण्याची प्रेरणा दिली. त्याचे चपळ क्षेत्ररक्षण इतरांसाठी निकष ठरले. याचे हजारोंनी अनुसरण केले."

vvs laxman praises mohammad kaif about his fielding benchmark for others
कैफचे क्षेत्ररक्षण इतर खेळाडूंसाठी 'बेंचमार्क', लक्ष्मणने केले कौतुक
author img

By

Published : Jun 12, 2020, 6:44 PM IST

हैदराबाद - भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने आपला माजी सहकारी आणि ऐतिहासिक नेटवेस्ट मालिकेचा नायक मोहम्मद कैफचे कौतुक केले आहे. कैफचे क्षेत्ररक्षण इतर खेळाडूंसाठी 'बेंचमार्क' होते, असे लक्ष्मणने म्हटले. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.

लक्ष्मणने ट्विटरवर कैफचा एक फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "भारताच्या तळागाळातील संरचनेचा माणूस. कैफने उत्तर प्रदेशातील संपूर्ण पिढीला असुरक्षिततेची भावना सोडून उच्च पातळीवर खेळण्याची प्रेरणा दिली. त्याचे चपळ क्षेत्ररक्षण इतरांसाठी निकष ठरले. याचे हजारोंनी अनुसरण केले."

  • A product of India’s robust grassroots structure, @MohammadKaif inspired an entire generation of players from Uttar Pradesh to shed their insecurities and play at the highest level. His electric fielding soon became the benchmark that thousands strived to emulate. pic.twitter.com/TwbZD7DB1x

    — VVS Laxman (@VVSLaxman281) June 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कैफ आपल्या फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षणासाठी अधिक ओळखला जात होता. कैफ हा क्षेत्ररक्षणात क्रांती करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. झिम्बाब्वेविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावल्यानंतरही तो संघात सातत्य राखू शकला नाही.

कैफने आत्तापर्यंत 13 कसोटी सामने खेळले असून 32.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 148 अशी आहे. 126 एकदिवसीय सामन्यात त्याने 2753 धावा केल्या असून या प्रकारात त्याची सर्वोच्च धावसंख्या 111 अशी आहे. कैफने टी-20 सामन्यांतही आपले कौशल्य दाखवले. 75 टी-20 सामने खेळताना त्याने 1237 धावा जमवल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.