मुंबई - कोरोना महामारीच्या काळात भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आपल्या मुलांना क्रिकेटचे धडे देताना दिसून आला. 'मुल्तानचा सुल्तान' विरेंद्र सेहवाग भारतीय संघाला वेदांत आणि आर्यवीर यांच्या रुपाने दुसरा सेहवाग देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत सेहवागचा मुलगा आर्यवीर चेंडू संपूर्ण ताकदीने टोलावताना पाहायला मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विरेंद्र सेहवागचा मुलगा वेदांत आणि आर्यवीर हे दोघे सध्या क्रिकेटसाठी मेहनत घेत आहे. या दोघांना खुद्द सेहवाग प्रशिक्षण देत आहे. आर्यवीर आणि वेदांत याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या दोघांची मेहनत पाहता ते लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसतील.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरेंद्र सेहवागने एका मुलाखतीमध्ये आपली दोन्ही मुलं क्रिकेटर व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. सेहवाग सद्या दोन्ही मुलांना क्रिकेटच्या मैदानावर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. वेदांत आणि आर्यवीर दोघे शाळेतील संघाकडून खेळतात. त्यांच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. या व्हिडिओला चाहत्यांमधूनही भरभरून दाद मिळते.
हेही वाचा - सरावासाठी परवानगी न घेतल्याने, बीसीसीआय शार्दुलवर नाराज?
हेही वाचा -टीम इंडियात परतण्यासाठी रोहितला करावं लागणार 'हे' काम