नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने कोरोनाव्हायरसच्या या कठीण काळात प्रवासी मजुरांना घरगुती जेवण दिले आहे. त्याच्या या कृतीमुळे सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सेहवागने स्वत: चा आणि आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर केला. यामध्ये तो लोकांसाठी अन्न पॅक करताना दिसत आहे. त्याने लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचा फोटोही शेअर केला आहे.
या मदतीसोबत सेहवागने आपल्या चाहत्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. "अन्न बनवून घरी पॅक करुन आणि या कठीण काळात ते गरजू प्रवासी मजुरांपर्यंत पोहोचल्याने जे समाधान मिळाले आहे, त्याची तुलना फार थोड्या गोष्टींशी करता येईल", असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले.
-
The satisfaction of cooking and packing food from the comfort of your own homes and courtsey the wonderful people at @udayfoundation distributing it to migrant labourers is the beauty of #GharSeSewa .If you would like to offer food seva for 100 people please DM to @SehwagFoundatn pic.twitter.com/Aar4INi64J
— Virender Sehwag (@virendersehwag) May 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The satisfaction of cooking and packing food from the comfort of your own homes and courtsey the wonderful people at @udayfoundation distributing it to migrant labourers is the beauty of #GharSeSewa .If you would like to offer food seva for 100 people please DM to @SehwagFoundatn pic.twitter.com/Aar4INi64J
— Virender Sehwag (@virendersehwag) May 28, 2020The satisfaction of cooking and packing food from the comfort of your own homes and courtsey the wonderful people at @udayfoundation distributing it to migrant labourers is the beauty of #GharSeSewa .If you would like to offer food seva for 100 people please DM to @SehwagFoundatn pic.twitter.com/Aar4INi64J
— Virender Sehwag (@virendersehwag) May 28, 2020
तो पुढे म्हणाला, "तुम्हाला जर तुमच्या घरातून 100 लोकांना मदत करायची असेल तर सेहवाग फाउंडेशनला मेसेज करा." शाबाश लाला, असा ट्विट करत हरभजनने सेहवागच्या या निर्णयाचे कौतुक केले.
कोरोना महामारीच्या काळात सेहवाग आपल्या मुलांना क्रिकेटचे धडे देताना दिसून आला होता. 'मुल्तानचा सुल्तान' म्हणून ख्याती असलेला सेहवाग भारतीय संघाला वेदांत आणि आर्यवीर यांच्या रुपाने दुसरा सेहवाग देण्यासाठी प्रयत्न करत आहे.