नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये रोहित शर्माने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला. रोहितने या स्पर्धेत ५ शतके ठोकत विश्वविक्रमही केला. यामुळे रोहित शर्माचे चाहत्यांमधून कौतूक होत आहे. तसेच या स्पर्धेत कर्णधार कोहलीनेही दमदार कामगिरी करत स्पर्धेत ५ अर्धशतके ठोकली. दरम्यान या दोन्ही खेळाडूंची धावा जमावण्याच्या बाबतीत मागील २ वर्षापासून तुलना केल्यास रोहित आणि विराटच्या खेळीत फारसा फरक नाही.
आम्ही मागील दोन वर्षापासूनची आकडेवारीची शहनिशा केली. त्यामध्ये आम्ही १३ जुलै २०१७ ते १३ जुलै २०१९ या काळात दोघांनी जमवलेल्या धावांची तुलना केली. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आकडेवरी जवळपास समान असल्याचे दिसले.
रोहित शर्माने जमवलेल्या धावा -
सलामीवीर रोहित शर्माने मागील दोन वर्षात ५७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६५. ७७ सरासराने ३२२३ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतके १६ अर्धशतकांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, रोहित शर्माने ९६.५२ च्या स्ट्राईक रेट धावा जमवल्या आहेत. यामध्ये त्याने २०८ धावांची सर्वोकृष्ट खेळी केली आहे.
विराट कोहलीने जमवलेल्या धावा -
कर्णधार विराट कोहलीने मागील दोन वर्षात ४७ सामने खेळले असून त्याने ४७ डावांत फलंदाजी करत ३०२९ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये ११ शतके १३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी ७७.६६ इतकी आहे. तर त्याने या धावा ९८.७२ च्या स्ट्राईक रेटने जमवल्या आहेत. यामध्ये विराटने १६० धावांची सर्वोकृष्ट खेळी केली आहे.