मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी ५ एप्रिल, रविवारी म्हणजे आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनला भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने पाठिंबा दर्शवला आहे.
विराट कोहलीने ट्विट करुन आपला पाठिंबा दर्शवला आहे. विराट म्हणतो, 'स्टेडियमची जान चाहते असतात. भारताची ताकद देशातील जनता आहे. चला तर मग जगाला दाखवून देऊ, आज रात्री ९ वाजता. आपण आपल्या आरोग्य वॉरियर्सच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, टीम इंडिया'
-
The power of the stadium is in its fans.
— Virat Kohli (@imVkohli) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The spirit of India is in its people.
Tonight 9pm for 9min
Let’s show the world, we stand as ONE.
Let’s show our Health Warriors,
We stand behind them.
Team India - IGNITED.@narendramodi @PMOIndia
">The power of the stadium is in its fans.
— Virat Kohli (@imVkohli) April 5, 2020
The spirit of India is in its people.
Tonight 9pm for 9min
Let’s show the world, we stand as ONE.
Let’s show our Health Warriors,
We stand behind them.
Team India - IGNITED.@narendramodi @PMOIndiaThe power of the stadium is in its fans.
— Virat Kohli (@imVkohli) April 5, 2020
The spirit of India is in its people.
Tonight 9pm for 9min
Let’s show the world, we stand as ONE.
Let’s show our Health Warriors,
We stand behind them.
Team India - IGNITED.@narendramodi @PMOIndia
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कोरोना विळखा दिवसागणिक अधिक घट्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अॅक्टिव रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
हेही वाचा - IPL आयोजनावर रैना म्हणाला.. सद्या लोकांचा जीव महत्वाचा, नंतर काय ते बघू
हेही वाचा - माजी खेळाडूने निवडला ऑलटाईम एकदिवसीय संघ, नेतृत्व 'या' भारतीय खेळाडूकडे