हैदराबाद - ख्रिसमस सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या सणाला प्रत्येक लहान मुलाला सांताक्लॉजचे खूप आकर्षण असते. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सांताक्लॉजच्या वेशात कोलकात्यातील अनाथआश्रमात पोहोचला आणि त्याने अनाथ मुलांना भेटवस्तू व खाऊ दिले. विराटला सांताक्लॉजच्या रुपात पाहून मुलांच्या चेहर्यावर हास्य दिसून आले.
ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलं आपल्याला भेटवस्तू आणि आवडीचा खाऊ देणाऱ्या सांताक्लॉजची वाट पाहत असतात. अनाथ मुलांनाही हा आनंद अनुभवता यावा, यासाठी विराटने सांताक्लॉजच्या रुपात अनाथ आश्रमात पोहोचला. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने विराट कोहलीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
-
Watch @imVKohli dress up as 🎅 and bring a little Christmas cheer to the kids who cheer our sportspersons on, all year long!
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
This joyful season, let’s remember to spread the love. pic.twitter.com/VF8ltmDZPm
">Watch @imVKohli dress up as 🎅 and bring a little Christmas cheer to the kids who cheer our sportspersons on, all year long!
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2019
This joyful season, let’s remember to spread the love. pic.twitter.com/VF8ltmDZPmWatch @imVKohli dress up as 🎅 and bring a little Christmas cheer to the kids who cheer our sportspersons on, all year long!
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2019
This joyful season, let’s remember to spread the love. pic.twitter.com/VF8ltmDZPm
या व्हिडिओत विराट सांताक्लॉजच्या वेशात लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. एका मुलाने तुझी दाढी मला खूप आवडते असं विराटला सांगितलं. हे ऐकून विराटलाही हसू आवरलं नाही.
सध्या भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर वेस्ट इंडीज विरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून पहिला सामना विंडीजने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला आहे. रविवारी (२२ डिसेंबर ) या मालिकेतला अंतिम निर्णायक सामना कटकच्या मैदानात खेळवला जाणार आहे.
हेही वाचा - कटक वनडेपूर्वी कोहली कंपनीने घेतला ब्रेक, पाहा काय करताहेत तुमचे आवडते खेळाडू?
हेही वाचा - ३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफला IPLमध्ये कुणीही वाली नाही... इरफाननं केलं भावूक ट्विट