हॅमिल्टन - पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४७ धावा, धावफलकावर लावूनही भारतीय संघाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर, टॉम लाथम आणि हेन्री निकोलस या त्रिमूर्तीने भारताचा तोंडचा घास पळवला. भारतीय संघ हा सामना जिंकू शकला असता. मात्र, तरीही का पराभूत झाला, याचे विश्लेषण खुद्द भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पराभवानंतर विराट म्हणाला की, 'आम्ही धावफलकावर मोठी धावसंख्या उभारली होती. ती पुरेशी होती. पण रॉस टेलर आणि टॉम लाथम यांनी चांगली फलंदाजी करत सामना आमच्याकडून हिरावून घेतला. न्यूझीलंडने या सामन्यात चांगली कामगिरी केली. या विजयाचे श्रेय टेलर आणि लाथम यांना जाते.'
सामना जिंकायची आम्हालाही अनेक संधी मिळाल्या. पण आम्ही त्या गमावल्या. या पराभवातून आम्हाला बरेच शिकण्यासारखे आहे. पण या पराभवानंतर नकारात्मकता येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. न्यूझीलंडने आमच्यापेक्षा चांगला खेळ करत हा सामना जिंकला. यापुढच्या सामन्यात त्यांच्यापेक्षा सरस खेळ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही विराट म्हणाला.
रॉस टेलरचे नाबाद शतक आणि कर्णधार टॉम लाथम-हेन्री निकोलस या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून जिंकला. भारताने दिलेले ३४८ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे.
हेही वाचा - Ind vs NZ : अखेर न्यूझीलंड विजयी, ३४७ धावा करुनही भारताचा दारुण पराभव
हेही वाचा - IND vs NZ : टीम इंडियाला 'ही' चूक भोवली, बुमराह, शार्दुल ठरले खलनायक