नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताला पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर ढकलले. त्यानंतर या पराभवाचे समीक्षण होण्यास सुरुवात झाली. आणि यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मांमध्ये मतभेद असल्याचे म्हटले जात होते. आता या चर्चांना विराटनेच प्रत्यूत्तर दिले आहे. विराटने संघाच्या ड्रेसिंगरुममधील वातावरण खेळीमेळीत असल्याचे सांगितले आहे.
विराट म्हणाला, 'सध्या ड्रेसिंगरूममध्ये कोणावर कसलेही दडपण नाही. सर्व खेळाडू त्यांचे मत मांडू शकतात. मी जसा कुलदीप यादवसोबतच वागतो तसच धोनीसोबत वागतो मी ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्ही करू नका असे मी त्यांना नेहमी सांगतो. विराट पुढे म्हणाला, 'मी तरुणांना नेहमी प्रोत्साहन देत राहतो. त्यांची कारकीर्द २ ते ३ वर्षात चांगली होऊ शकते. त्यांच्याशी चर्चा करुन चुका न करण्यास सांगतो.'
संपूर्ण स्पर्धेत अफलातून प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य सामन्यात खराब फलंदाजीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते.