दुबई - आयसीसीने रविवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या तर, विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा (आठव्या) आणि अजिंक्य रहाणे (दहाव्या) क्रमवारीत कायम आहेत.
या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट नवव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शून्य आणि नऊ धावा करणारा बेन स्टोक्स चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १५६ धावा करणारा डावखुरा फलंदाज मसूद कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट १९व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानविरूद्ध पहिल्या कसोटीत ८४ धावा करणारा ख्रिस वोक्स फलंदाजांच्या क्रमवारीत ७८ तर, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर, जोस बटलर ३० व्या स्थानी आला आहे. इंग्लंडचा ओली पोप कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट ३६ व्या स्थानावर पोहोचला आहे.
-
⭐ Chris Woakes rises to No.7
— ICC (@ICC) August 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐ Stuart Broad enters top 10
The @MRFWorldwide ICC Test Rankings after the first #ENGvPAK Test 👉 https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/cnlc8mku13
">⭐ Chris Woakes rises to No.7
— ICC (@ICC) August 9, 2020
⭐ Stuart Broad enters top 10
The @MRFWorldwide ICC Test Rankings after the first #ENGvPAK Test 👉 https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/cnlc8mku13⭐ Chris Woakes rises to No.7
— ICC (@ICC) August 9, 2020
⭐ Stuart Broad enters top 10
The @MRFWorldwide ICC Test Rankings after the first #ENGvPAK Test 👉 https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/cnlc8mku13
गोलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाह आणि शादाब खान अनुक्रमे २२ व्या आणि ६९ व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर, स्टुअर्ट ब्रॉडने या यादीत तिसरे स्थान कायम राखले आहे. जोफ्रा आर्चरने ३७ वे स्थान राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स या यादीत अव्वल स्थानी असून भारताचा जसप्रीत बुमराह आठव्या, रविंद्र जडेजा तिसऱ्या आणि फिरकीपटू अश्विवन पाचव्या स्थानी आहे.