नवी दिल्ली - वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराने, विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघात टी-२० विश्व करंडक जिंकण्याची क्षमता असल्याचे सांगितले. यावर्षी टी-२० वर्षी विश्व करंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
लाराने टी-२० विश्व करंडक स्पर्धेविषयी सांगितले की, 'प्रत्येक संघाला माहिती आहे की, आपल्याला भारताविरुद्ध महत्वाचा सामना खेळावा लागणार आहे. तो उपउपांत्य असो की उपांत्य फेरीचा असो, अथवा अंतिम सामना असो. भारतीय संघ माझ्या मते, विश्व करंडक स्पर्धेचा प्रमुख दावेदार आहे.'
भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्व करंडक जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाला अद्याप टी-२० विश्व करंडक जिंकता आलेले नाही. पण, ऑस्ट्रेलियात होणारा विश्व करंडक जिंकण्याची भारतीय संघाला संधी आहे.
भारतीय संघ मागील काही वर्षांपासून आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठतो. पण संघाला विजेतेपद पटकावता आलेले नाही. भारतीय संघाने २०१३ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अद्याप भारताला एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही.
विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१९ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्व करंडकाची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागला होता.