गयाना - टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात होणारा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे या सामन्याची रंगत जरी चाहत्यांना पाहायला मिळाली नसली तरी, विराटच्या नृत्याचे सर्वजण साक्षीदार झाले.
गुरुवारी खेळवल्या गेलेल्या या सामन्यात फक्त १३ षटके टाकली गेली. या षटकाच्या दरम्यान विराटने चाहत्यांचे मनोरंजन केले. ब्रेकच्या नंतर पंचानी खेळाडूंना मैदानावर बोलावले. त्यावेळी पावसामुळे विराटने आपला मूड खराब होऊ दिला नाही. त्याने डीजेच्या तालावर नाचायला सुरुवात केली.
-
Teacher: No one will dance in the class.
— Parth Goradia (@parthgoradia13) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Le Backbenchers:@BCCI @imVkohli#INDvWI #India #Kohli pic.twitter.com/9R1fulVBHT
">Teacher: No one will dance in the class.
— Parth Goradia (@parthgoradia13) August 8, 2019
Le Backbenchers:@BCCI @imVkohli#INDvWI #India #Kohli pic.twitter.com/9R1fulVBHTTeacher: No one will dance in the class.
— Parth Goradia (@parthgoradia13) August 8, 2019
Le Backbenchers:@BCCI @imVkohli#INDvWI #India #Kohli pic.twitter.com/9R1fulVBHT
आपल्या सहकाऱयांना नाचवत त्याने समोरच्या संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेललाही आपल्यासोबत नाचवले. गेल आणि विराट हे आयपीएलमध्ये बंगळूरु संघाकडून एकत्र खेळले आहेत. बीसीसीआयने या दोघांचा फोटो शेअर केला आहे.
या सामन्यात, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीवर बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. यानंतर एविन लुईसने फटकेबाजी करत संघाला अर्धशतकी टप्पा गाठून दिला.