दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले आहे. कोहली 928 गुणांसह प्रथम तर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसर्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची घसरण झाली आहे.
हेही वाचा - पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय चाहत्याला दिलं 'खास' गिफ्ट
मंगळवारी जाहीर झालेल्या या यादीत रहाणेला सातवे स्थान मिळाले आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर ८६४ गुणांसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावर भारताचा चेतेश्वर पुजारा तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन पाचव्या स्थानावर आहे.
कराची कसोटीत शतक झळकावणारा पाकिस्तानचा बाबर आझम तीन स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानी आला आहे. रहाणेची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा हे दोन भारतीय फलंदाज अव्वल २० फलंदाजांमध्ये पोहोचले आहेत. मयांक १२ व्या तर, रोहित १५ व्या स्थानावर आहे.