मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला न्यूझीलंडने १८ धावांनी धूळ चारली. भारताच्या या पराभवानंतर दिग्गज खेळाडूंनी धोनीला चौथ्या नंबरवर फलंदाजीला न पाठवल्याने पराभव झाल्याचे सांगितले. यावर कर्णधार कोहलीने स्पष्टीकरण दिले.
खालच्या फळीत डावाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आम्ही धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची योजना आखली होती. या योजने प्रमाणे धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले, असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले. तो सामन्यानंतर पत्रकारांशी बोलत होता.
ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी चुकीचा फटका मारुन बाद झाले असे तुला वाटते का असे विचारल्यानंतर यावर कोहली म्हणाला. पंत आणि पांड्याने चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी चुकीच्या फटक्याचा बळी ठरले. असे सांगत त्याने पंत आणि पांड्याचा बचाव केला.