मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची सोशल मीडियावर क्रेझ असून त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर १०० मिलियन म्हणजे १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. इन्सावर इतके फॉलोअर्स असलेला तो भारताचा आणि आशियाचा पहिला सेलिब्रेटी आहे. विराट कोहलीच्या या विक्रमाचे आयसीसीने ट्विट करत कौतुक केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगभरातील सेलिब्रेटींमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा अव्वल स्थानी आहे. रोनाल्डोनंतर फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार यांचा नंबर लागलो. त्यांचे अनुक्रमे १८.७ कोटी, १४.७ कोटी इतके फॉलोअर्स आहेत. या यादीत आता विराटच्या नावाची भर पडली आहे. विराट इस्टाग्रामवरील एका पोस्टमागे सर्वाधिक रक्कम कमावणाऱ्या सेलिब्रेटीच्या यादीत टॉप-१० मध्ये आहे.
भारतीय सेलिब्रेटीमध्ये विराटचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. विराटनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा (६.०८ कोटी) हिचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. त्यानंतर श्रद्धा कपूर (५.८ कोटी), दीपिका पादुकोण (५.३३ कोटी) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (५.१२) कोटी यांचा क्रमांक येतो.
हेही वाचा - इंग्लडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वरुण चक्रवर्ती पडणार बाहेर?
हेही वाचा - Vijay Hazare Trophy: महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात