ETV Bharat / sports

मैदानावर पाऊल ठेवताच विराटच्या नावावर खास विक्रमाची नोंद - विराट कोहली लेटेस्ट न्यूज

विराट कोहली भारतासाठी २५० एकदिवसीय सामने खेळणारा नववा खेळाडू ठरला आहे. भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने भारताकडून ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

virat kohli became the 9th player to play 250 odis for india
मैदानावर पाऊल ठेवताच विराटच्या नावावर खास विक्रमाची नोंद
author img

By

Published : Nov 29, 2020, 12:34 PM IST

सिडनी - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतासाठी २५० एकदिवसीय सामने खेळणारा नववा खेळाडू ठरला आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एसीजी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात त्याने हा विक्रम केला. ३२ वर्षीय कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याने ८६ कसोटी आणि ८२ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कोहलीने सर्व स्वरूपात मिळून २१, ०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

हेही वाचा - न्यूझीलंडला मिळाला नवा तारा...टी-२०मध्ये नोंदवले जलद शतक

भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने भारताकडून ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनी (३४७), राहुल द्रविड (३४०), मोहम्मद अझरुद्दीन (३३४), सौरव गांगुली (३०८), युवराज सिंग (३०१), अनिल कुंबळे (२६९) यांचा समावेश आहे.

सचिन हा जागतिक स्तरावर सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने असून त्याने ४४८ सामने खेळले आहेत. सनथ जयसूर्याने ४४५, कुमार संगकाराने ४०४, शाहिद आफ्रिदीने ३९८, इंझमाम-उल-हकने ३७८ आणि रिकी पॉन्टिंगने ३७५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.