ETV Bharat / sports

मोहाली येथे सचिनचा 'हा' विक्रम रोहित-विराटच्या रडारवर

मोहालीच्या मैदानावर सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम हा सचिनच्या नावावर आहे. त्याने ७ सामन्यात ६१ च्या सरासरीने ३६६ धावा केल्या आहेत.

विराट कोहली ११
author img

By

Published : Mar 10, 2019, 3:34 PM IST

मोहाली - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे चौथा एकदिवसीय सामना रंगणार आहे. मागील सामन्यात भारताला ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल.

मोहालीच्या मैदानावर सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम हा सचिनच्या नावावर आहे. त्याने ७ सामन्यात ६१ च्या सरासरीने ३६६ धावा केल्या आहेत. यानंतर, धोनीने ९ सामन्यात ३६३ धावा केल्या आहेत. परंतु, धोनी या सामन्यात खेळणार नाही. रोहित शर्माने ४ सामन्यात ३१५ धावा केल्या आहेत. तर, कोहलीने ६ सामन्यात ३०२ धावा बनवल्या आहेत. दोघांनीही आज अनुक्रमे ५१ आणि ६४ धावा केल्यास मोहाली येथे सर्वात जास्त धावा काढण्याच्या बाबतीत सचिनला मागे टाकू शकतात.

रोहित शर्मासाठी मोहालीचे मैदान खास असून, त्याने याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०८ धावांची खेळी करताना कारकिर्दीतले तिसरे द्विशतक झळकावले होते. मोहाली येथे झालेल्या दोन्ही संघात झालेल्या ४ एकदिवसीय सामन्यात भारताला ३ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दोन्ही संघात १९ ऑक्टोबर २०१३ साली झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ गडी राखून पराभव केला होता.

Intro:Body:

Virat kohli and Rohit Sharma have chance to break sachin record at mohali

Virat kohli, Rohit Sharma, chance, break, sachin, record, mohali, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, मोहाली

मोहाली येथे सचिनचा 'हा' विक्रम रोहित-विराटच्या रडारवर

मोहाली - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी बिंद्रा स्टेडियम,  मोहाली येथे चौथा एकदिवसीय सामना रंगणार आहे. मागील सामन्यात भारताला ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल.

मोहालीच्या मैदानावर सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम हा सचिनच्या नावावर आहे. त्याने ७ सामन्यात ६१ च्या सरासरीने ३६६ धावा केल्या आहेत. यानंतर, धोनीने ९ सामन्यात ३६३ धावा केल्या आहेत. परंतु, धोनी या सामन्यात खेळणार नाही. रोहित शर्माने ४ सामन्यात ३१५ धावा केल्या आहेत. तर, कोहलीने ६ सामन्यात ३०२ धावा बनवल्या आहेत. दोघांनीही आज अनुक्रमे ५१ आणि ६४ धावा केल्यास मोहाली येथे सर्वात जास्त धावा काढण्याच्या बाबतीत सचिनला मागे टाकू शकतात.

रोहित शर्मासाठी मोहालीचे मैदान खास असून, त्याने याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०८ धावांची खेळी करताना कारकिर्दीतले तिसरे द्विशतक झळकावले होते. मोहाली येथे झालेल्या दोन्ही संघात झालेल्या ४ एकदिवसीय सामन्यात भारताला ३ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दोन्ही संघात १९ ऑक्टोबर २०१३ साली झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ गडी राखून पराभव केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.