ETV Bharat / sports

निवृत्तीच्या निर्णयावर 'यू टर्न' घेतलेल्या अंबातीची नाबाद खेळी; संघाला मिळवून दिला विजय

author img

By

Published : Oct 1, 2019, 8:51 PM IST

अंबाती रायडू विजय हजारे करंडक स्पर्धेत हैदराबाद संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. या स्पर्धेत खेळताना रायुडूने कर्नाटक विरुध्दच्या सामन्यात नाबाद ८७ धावांनी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी उतरलेल्या रायुडूने १११ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावांची नाबाद खेळी केली.

निवृत्तीच्या निर्णयावर 'यू टर्न' घेतलेल्या अंबातीने केली नाबाद खेळी, संघाला मिळवून दिला विजय

नवी दिल्ली - टीम इंडियाचा फलंदाज अंबाती रायुडूने, विश्वकरंडक २०१९ साठी संघात स्थान न मिळाल्याने, तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याने विचार करून पुन्हा निवृत्ती माघार घेतली. रायुडू सध्या टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून विजय हजारे करंडक स्पर्धेत त्याने दमदार खेळी केली.

हेही वाचा - विराट म्हणतो, रोहितने आक्रमक सुरूवात दिली की संपलं...त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देऊ

अंबाती रायडू विजय हजारे करंडक स्पर्धेत हैदराबाद संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. या स्पर्धेत खेळताना रायुडूने कर्नाटक विरुध्दच्या सामन्यात नाबाद ८७ धावांनी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी उतरलेल्या रायुडूने १११ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावांची नाबाद खेळी केली.

दरम्यान, हैदराबाद विरुध्द कर्नाटक सामन्यात नाणेफेक जिंकून कर्नाटकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हैदराबाद संघाने, निर्धारीत ५० षटकात ९ बाद १९८ धावा केल्या. यात रायुडूने नाबाद ८७ धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. तेव्हा १९९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कर्नाटकचा संघ ४५.२ षटकात १७७ धावांवर ढेपाळला. हैदराबादकडून संदिपने चार गडी बाद करत कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले.

हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, हार्दिक पांड्या 'या'मुळं अनिश्चित कालावधीपर्यंत क्रिकेटपासून लांब राहणार

Intro:Body:

Sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.