ETV Bharat / sports

भारतातील सहा ठिकाणी रंगणार विजय हजारे करंडक स्पर्धा - विजय हजारे ट्रॉफी लेटेस्ट न्यूज

स्पर्धेचे सर्व सामने बायो बबलमध्ये खेळले जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १४ मार्च रोजी खेळविण्यात येणार आहे. विजय हजारे स्पर्धेसाठी बीसीसीआयने गट तयार केले आहेत.

vijay-hazare-trophy
vijay-hazare-trophy
author img

By

Published : Feb 7, 2021, 9:35 AM IST

जयपूर - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २० फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा सहा शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व संघ १३ फेब्रुवारीला जैव-सुरक्षित वातावरणात दाखल झाल्यानंतर त्यांच्या तीन वेळा करोना चाचणी घेण्यात येणार आहेत.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पर्धेच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात त्यांनी सहा ठिकाणांपैकी पाच ठिकाणांचा उल्लेख केला आहे. सुरत, इंदोर, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर ह्या प्रमुख शहरात ही स्पर्धा खेळावली जाणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना १३ फेब्रुवारीला बायो-बबलमध्ये यावे लागेल आणि त्यांनतर त्यांना तीन वेळा कोरोनाची चाचणी करावी लागेल.

गट -

  • गट ए – गुजरात, चंदीगड, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा, गोवा
  • गट बी- तमिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश
  • गट सी – कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिसा, रेल्वे आणि बिहार
  • गट डी -दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पॉंडिचेरी
  • गट ई- बंगाल,सेना, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र, हरियाणा आणि चंदिगड
  • प्लेट गट – उत्तराखंड, आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि सिक्कीम

हेही वाचा - आपले क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, शरद पवारांचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.