ETV Bharat / sports

विजय हजारे करंडक : RCBच्या फलंदाजाची फटकेबाजी; सलग चौथे शतक ठोकत संगकाराच्या विक्रमाशी केली बरोबरी - Padikkal Scores 4th Consecutive Century in Hazare Trophy 2021

कर्नाटकच्या देवदत्त पडीक्कलने केरळविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात खणखणीत १०१ धावांची शतकी खेळी केली आहे. हे देवदत्तचे या स्पर्धेतील सलग चौथे शतक ठरले. या शतकासह देवदत्तने श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराच्या सलग ४ एकदिवसीय शतकांची बरोबरी केली आहे.

Vijay Hazare Trophy 2021 : Devdutt Padikkal Scores Fourth Consecutive Century equal to kumar sangakkara world record
विजय हजारे करंडक : RCBच्या फलंदाजाची फटकेबाजी; सलग चौथे शतक ठोकत संगकाराच्या विक्रमाशी केली बरोबरी
author img

By

Published : Mar 8, 2021, 3:57 PM IST

मुंबई - विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज देवदत्त पडीक्कलची एक्सप्रेस सुसाट फॉर्मात आहे. त्याने केरळविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात खणखणीत १०१ धावांची शतकी खेळी केली. हे देवदत्तचे या स्पर्धेतील सलग चौथे शतक ठरले. या शतकासह देवदत्तने श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराच्या सलग ४ एकदिवसीय शतकांची बरोबरी केली आहे.

केरळने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा कर्नाटकच्या रवीकुमार समर्थ आणि देवदत्त या सलामी जोडीने केरळच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तब्बल २४९ धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान देवदत्तने आपले शतक पूर्ण केले. देवदत्तने ११८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारासह १०१ धावांची खेळी केली.

देवदत्तचे हे शतक विजय हजारे करंडक स्पर्धेतील सलग चौथे शतक ठरले. यासह देवदत्तने संगकाराच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सलग ४ शतकं ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. देवदत्तने याआधी २४ फेब्रुवारीला ओडिसाविरुद्ध १५२ धावांची खेळी साकारली होती. तर २६ फेब्रुवारीला केरळविरोधात त्याने नाबाद १२६ धावा केल्या. तर रेल्वेविरुद्ध २८ फेब्रुवारीला नाबाद १४५ धावांची खेळी केली होती. देवदत्तने या हंगामातील ६ सामन्यात ४ शतकं आणि २ अर्धशतकांसह ६७३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा - सासरा शाहिद आफ्रिदीने ठोकला षटकार, त्यानंतर गोलंदाज जावईची कमाल, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - Women's Day : अनुष्का-वामिकाचा फोटो शेअर करत विराटने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.