ETV Bharat / sports

वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना इनामाची रक्कम देणार विदर्भ संघ - MONEY

उभय संघातील खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती लावून मैदानात उतरले आणि दहशतवादी कृत्याचा निषेध केला.

विदर्भ संघ
author img

By

Published : Feb 16, 2019, 6:25 PM IST

नागपूर - सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडकावर नाव कोरण्याची कामगिरी विदर्भच्या संघाने आज केली. या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम विदर्भाच्या संघाने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे.

सामन्याच्या सुरुवातीला चौथ्या दिवशी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या सीआरपीएफ जवानांना विदर्भ आणि शेष भारताच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. उभय संघातील खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती लावून मैदानात उतरले आणि दहशतवादी कृत्याचा निषेध केला.

पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आले. हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार कर्णधार फैज फझल याने ही घोषणा केली आहे.

आम्ही बक्षीसाची रक्कम पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबीयांना देणार आहोत. आमच्याकडून ही एक छोटीशी मदत असेल अशी प्रतिक्रिया विदर्भाचा कर्णधार फैज फजल याने दिली.

इराणी ट्रॉफी विजेत्या संघाला मोठ्या रक्कमेचे बक्षीस बीसीसीआयकडून मिळते. विदर्भाच्या संघाने सलग दोन वर्ष हे विजेतेपद जिंकताना मोठा इतिहास घडवला आहे.

Intro:Body:

 vidarbha cricket team donate prize money won irani trophy families crpf jawans killed pulwama terror

वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना इनामाची रक्कम देणार विदर्भ संघ  

नागपूर - सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडकावर नाव कोरण्याची कामगिरी विदर्भच्या संघाने आज केली. या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम विदर्भाच्या संघाने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे.

सामन्याच्या सुरुवातीला चौथ्या दिवशी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या सीआरपीएफ जवानांना विदर्भ आणि शेष भारताच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. उभय संघातील खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती लावून मैदानात उतरले आणि दहशतवादी कृत्याचा निषेध केला. 

पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आले. हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे.  त्यानुसार कर्णधार फैज फझल याने ही घोषणा केली आहे.

आम्ही बक्षीसाची रक्कम पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबीयांना देणार आहोत. आमच्याकडून ही एक छोटीशी मदत असेल अशी प्रतिक्रिया विदर्भाचा कर्णधार फैज फजल याने दिली.

इराणी ट्रॉफी विजेत्या संघाला मोठ्या रक्कमेचे बक्षीस बीसीसीआयकडून मिळते. विदर्भाच्या संघाने सलग दोन वर्ष हे विजेतेपद जिंकताना मोठा इतिहास घडवला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.