ETV Bharat / sports

कसोटीत ५ षटकार ठोकत उमेश यादवने केला मोठा विक्रम - उमेश यादवचा कसोटीतील षटकारांचा विक्रम

या खेळीमध्ये उमेश यादवने ३१० च्या स्ट्राईकरेटची नोंद केली आहे. कमीतकमी १० चेंडूचा सामना करणाऱ्या खेळाडूंपैकी हा सर्वोच्च स्ट्राईकरेट आहे. कसोटीत उमेशच्या अगोदर कोणत्याही खेळाडूला दहा चेंडूत इतक्या धावा करता आलेल्या नाहीत. त्याने जॉर्डन लिंडेविरूद्ध सर्व षटकार ठोकले आणि हा विक्रम आपल्या नावावर केला.

कसोटीत ५ षटकार ठोकत उमेश यादवने केला मोठा विक्रम
author img

By

Published : Oct 20, 2019, 5:31 PM IST

Updated : Oct 20, 2019, 6:24 PM IST

रांची - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात रांची येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव ४९७ धावांवर घोषित केला. कसोटीचा पहिला दिवस रोहित आणि अजिंक्यने गाजवला असला तरी, दुसरा दिवस उमेश यादवने आपल्या नावावर केला. प्रामुख्याने गोलंदाज अशी ओळख असलेल्या उमेशने फलंदाजीला मैदानात उतरत ५ षटकार ठोकले आणि खास विक्रमाला गवसणी घातली.

हेही वाचा - केएल राहुलसोबत 'डेट' विषयावर निधी अग्रवालने सोडलं मौन; म्हणाली होय, आम्ही भेटलो...

उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अवघ्या दहा चेंडूंचा सामना करत ३१ धावा केल्या. आपल्या तुफानी डावात एकूण ५ षटकार ठोकले. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने सहावा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र, तो यष्टीमागे झेलबाद झाला.

या खेळीमध्ये उमेश यादवने ३१० च्या स्ट्राईकरेटची नोंद केली आहे. कमीतकमी १० चेंडूचा सामना करणाऱ्या खेळाडूंपैकी हा सर्वोच्च स्ट्राईकरेट आहे. कसोटीत उमेशच्या अगोदर कोणत्याही खेळाडूला दहा चेंडूत इतक्या धावा करता आलेल्या नाहीत. त्याने जॉर्डन लिंडेविरूद्ध सर्व षटकार ठोकले आणि हा विक्रम आपल्या नावावर केला.

या विक्रमाव्यतिरिक्त कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार मारणारा ३१ वर्षीय उमेश यादव तिसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन षटकार ठोकले होते, तर फोफी विल्यम्सने त्यापूर्वी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा कारनामा केला होता. याशिवाय डावात चौकार न मारता पाच षटकार ठोकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Intro:Body:

umesh yadav create record after hitting 5 sixes

umesh yadav latest news, umesh yadav 5 sixes record, umesh yadav strike rate record, उमेश यादवचा कसोटीतील षटकारांचा विक्रम, उमेश यादव लेटेस्ट न्यूज

कसोटीत ५ षटकार ठोकत उमेश यादवने केला मोठा विक्रम

रांची - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात रांची येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव ४९७ धावांवर घोषित केला. कसोटीचा पहिला दिवस रोहित आणि अजिंक्यने गाजवला  असला तरी, दुसरा दिवस उमेश यादवने आपल्या नावावर केला. प्रामुख्याने गोलंदाज अशी ओळख असलेल्या उमेशने फलंदाजीला मैदानात उतरत ५ षटकार  ठोकले आणि खास विक्रम आपल्या नावावर केला.

हेही वाचा - 

उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अवघ्या दहा चेंडूंचा सामना करत ३१ धावा केल्या. आपल्या तुफानी डावात एकूण ५ षटकार ठोकले. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने सहावा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र, तो यष्टीमागे झेलबाद झाला.

या खेळीमध्ये उमेश यादवने ३१० च्या स्ट्राईकरेटची नोंद केली आहे. कमीतकमी १० चेंडूचा सामना करणाऱ्या खेळाडूंपैकी हा सर्वोच्च स्ट्राईकरेट आहे. कसोटीत उमेशच्या अगोदर कोणत्याही खेळाडूला दहा चेंडूत इतक्या धावा करता आलेल्या नाहीत. त्याने जॉर्डन लिंडेविरूद्ध सर्व षटकार ठोकले आणि हा विक्रम आपल्या नावावर केला.

या विक्रमाव्यतिरिक्त कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार मारणारा ३१ वर्षीय उमेश यादव तिसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन षटकार ठोकले होते, तर फोफी विल्यम्सने त्यापूर्वी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा कारनामा केला होता. याशिवाय डावात चौकार न मारता पाच षटकार ठोकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.