ETV Bharat / sports

१२ वर्षांचा 'जबरा फॅन', क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी तब्बल ४ वर्षे करत होता 'हे' काम - ashes series fan news

या छोट्या चाहत्याचे नाव आहे, मॅक्स वॅट. मॅक्सने २०१५ ची विश्वकरंडक स्पर्धा पाहिली होती. त्यानंतर त्याला अ‌ॅशेसचे वेध लागले होते. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने मॅक्सला ही मालिका पाहणे शक्य झाले नाही. त्याच्या वडिलांनी मॅक्सला '१५०० डॉलर्स कमव मग सामना पाहायला जाऊ' असे वचन दिले.

१२ वर्षांचा 'जबरा फॅन', क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी तब्बल ४ वर्षे करत होता 'हे' काम
author img

By

Published : Sep 6, 2019, 5:52 PM IST

नवी दिल्ली - कसोटी क्रिकेट म्हटलं, की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवली जाणारी अ‌ॅशेस मालिका हमखास डोळ्यासमोर येते. या मालिकेसाठी दोन्ही देशांचे चाहते एकदम आतुर असतात. यंदाच्या अ‌ॅशेसमध्येही एक १२ वर्षांचा 'जबरा फॅन सापडला आहे. त्याने ही मालिका पाहण्यासाठी तब्बल चार वर्षे कचरा गोळा करुन पैसे कमावले.

हेही वाचा - US OPEN : राफेल नदालची उपांत्यफेरीत धमाकेदार 'एन्ट्री'

या छोट्या चाहत्याचे नाव आहे, मॅक्स वॅट. मॅक्सने २०१५ ची विश्वकरंडक स्पर्धा पाहिली होती. त्यानंतर त्याला अ‌ॅशेसचे वेध लागले. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने मॅक्सला ही मालिका पाहणे शक्य झाले नाही. त्याच्या वडिलांनी मॅक्सला '१५०० डॉलर्स कमव मग सामना पाहायला जाऊ' असे वचन दिले.

to watch ashes series 12 year old max waight collected garbage for last four years
मॅक्स वॅट

मॅक्सने हे आव्हान स्विकारले. एका घरामागे एक डॉलर अशा कमाईसाठी तो कचरा उचलायचा. शेजारची घरे आणि त्याला जिथंपर्यंत शक्य होईल, असे करत त्याने तब्बल चार वर्षांपर्यंत हे काम केले. तो जेव्हा आजारी पडायचा तेव्हाच तो सुट्टी घेत असे. त्यावेळी त्याचा भाऊ किंवा आईवडील जाऊन कचरा गोळा करायचे.

चार वर्षांपर्यंत त्याने हे काम करुन १५०० डॉलर्स कमावले. त्यानंतर, मॅक्सच्या वडिलांनी इंग्लंडची तिकिटे काढली आणि त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. इंग्लंडमध्ये आल्यानंतर मॅक्सची ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळा़डू स्टीव वॉ आणि इतर खेळाडूंशी भेट झाली. मॅक्स आणि त्याच्या भावाला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाबरोबर प्रवास करण्याची संधीही मिळाली.

मॅक्स वॅट आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू

Intro:Body:

१२ वर्षांचा 'जबरा फॅन', क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी तब्बल ४ वर्षे करत होता 'हे' काम

नवी दिल्ली - कसोटी क्रिकेट म्हटलं की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवली जाणारी अ‌ॅशेस मालिका हमखास डोळ्यासमोर येते. या मालिकेसाठी दोन्ही देशांचे चाहते एकदम आतुर असतात. यंदाच्याही अ‌ॅशेसमध्ये एक १२ वर्षांचा 'जबरा फॅन सापडला आहे. त्याने ही मालिका पाहण्यासाठी तब्बल चार वर्षे कचरा गोळा करुन पैसे कमावले.

या छोट्या चाहत्याचे नाव आहे, मॅक्स वॅट. मॅक्सने २०१५ ची विश्वकरंडक स्पर्धा पाहिली होती. त्यानंतर त्याला अ‌ॅशेसचे वेध लागले होते. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने मॅक्सला ही मालिका पाहणे शक्य झाले नाही. त्याच्या वडिलांनी मॅक्सला '१५०० डॉलर्स कमव मग सामना पाहायला जाऊ' असे वचन दिले.

मॅक्सने हे आव्हान स्विकारले. एका घरामागे एक डॉलर अशा कमाईपोटी तो कचरा उचलायचा. शेजारची घरे आणि त्याला जिथंपर्यंत शक्य होईल असे करत त्याने तब्बल चार वर्षांपर्यंत हे काम केले. तो जेव्हा आजारी पडायचा तेव्हाच तो सुट्टी घेत असे. त्यावेळी त्याचा भाऊ किंवा आईवडील जाऊन कचरा गोळा करायचे.

चार वर्षांपर्यंत त्याने हे काम करुन १५०० डॉलर्स कमावले. त्यानंतर, मॅक्सच्या वडिलांनी इंग्लंडची तिकिटे काढली. आणि त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. इंग्लंडमध्ये आल्यानंतर मॅक्सची ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळा़डू स्टीव वॉ आणि इतर खेळाडूंशी भेट झाली. मॅक्स आणि त्याच्या भावाला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाबरोबर प्रवास करण्याची संधीही मिळाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.