ETV Bharat / sports

अभिनेता शाहरुख खानच्या संघाने वेस्ट इंडिजमध्ये केली मदत - Trinbago Knight Riders corona help news

टीकेआरने त्रिनिबागो भागात अन्नदान केले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या या फ्रेंचायझीने ही माहिती दिली. याशिवाय फ्रेंचायझीने आणखी काही वस्तूंचे वितरण केले आहे.

TKR distributed 1000 food packets in trinidad and tobago
अभिनेता शाहरुख खानच्या संघाने वेस्ट इंडिजमध्ये केली मदत
author img

By

Published : May 9, 2020, 7:47 AM IST

कोलकाता - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या त्रिनिबागो नाइट रायडर्स (टीकेआर) या वेस्ट इंडीज संघाने कोरोनाच्या कठीण काळात मदतीचा हात पुढे केला आहे. टीकेआरने त्रिनिबागो भागात अन्नदान केले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या या फ्रेंचायझीने ही माहिती दिली.

शाहरुखने ट्विटरवर लिहिले, की टीकेरायडर्सने हॅडको लिमिटेडबरोबर चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या गरजू लोकांना एक हजार खाद्यपदार्थाची पाकिटे वाटली." याशिवाय फ्रेंचायझीने आणखी काही वस्तूंचे वितरण केले आहे.

टीकेआरचे संचालक वेंकी मैसूर म्हणाले, "या समस्येने आपल्यासमोर कोणते आव्हान आणले हे सर्वांनाच ठाऊक आहे. टीकेआर कुटुंबाला यात योगदान द्यायचे आहे. या योगदानामुळे आम्हाला त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील लोकांचे दुःख कमी करावेसे वाटते."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.