मेलबर्न - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीमध्ये दाखल झाला आहे. खेळाडू सद्या क्वारंटाइन आहेत. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने विराट कोहलीसंदर्भात, तो आणि त्याचे खेळाडू काय विचार करतात हे सांगितलं आहे.
टिम पेनने सांगितले की, ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू विराटचा तिरस्कार करणे पसंत करतात. असे असले तरी एक क्रिकेटर म्हणून विराटचा आदर देखील ते करतात.
मला नेहमी विराटविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. तो माझ्यासाठी इतर खेळाडूंसारखाच आहे. खरे सांगायचे झाल्यास त्याचा आणि माझा जास्त संबध येत नाही. मी फक्त त्याला नाणेफेक दरम्यान भेटतो आणि त्याच्याविरुद्ध मैदानात उतरतो, असेही पेन याने सांगतिले.
ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू विराटचा तिरस्कार करणे पसंत करतात. पण क्रिकेट चाहते म्हणून विराटला फलंदाजी करताना पाहायला आवडते. तो कोणत्याही गोष्टीत सर्वश्रेष्ट ठिसतो. आम्ही त्याला फलंदाजी करताना पाहू इच्छितो, पण जास्त धावाही त्याने करू नये, असाही विचार आम्ही करतो, असेही टिमने सांगितले.
दरम्यान, याआधी भारतीय संघाने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकत इतिहास रचला. विराट या मालिकेत अनेकदा ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंशी पंगा घेताना पाहायला मिळाला होता.
उभय संघात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्याची कसोटी मालिक खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - Happy Diwali २०२०: विराट कोहली, रहाणेसमवेत देशी-विदेशी खेळाडूंनी दिल्या दीपोत्सवाच्या शुभेच्छा
हेही वाचा -माझ्याविरोधात शॉर्टपिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर पचतावचाल, स्मिथने भारतीय गोलंदाजांना डिवचलं