नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचे उर्वरित दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे सामने १५ मार्च आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणार होते. वृत्तसंस्था पीटीआयने ही माहिती दिली.
-
India's remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India's remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020India's remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020
हेही वाचा - सौराष्ट्राने जिंकले रणजीचे पहिलवहिले विजेतेपद
या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुवून गेला. पण आता उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत.
आयपीएलही पुढे -
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.