हैदराबाद - आयपीएलमध्ये बुधवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्याच पराभवानंतर चेन्नईचे नेतृत्व करणाऱ्या सुरेश रैनाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, आमच्या संघाला हैदराबादविरुद्ध मिळालेली हार ही डोळे उघडण्यासाठी पुरेशी आहे.
जॉनी बेअरस्टो (६१) आणि डेव्हिड वॉर्नर (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईवर मोठा विजय मिळवत त्यांचा विजयरथ रोखला होता. सामना संपल्यानंतर रैना म्हणाला, 'मला वाटते की आम्ही अधिक स्ट्राइक रोटेट करायला हवी होती, या सामन्यात आमच्या ३० धावा कमी झाल्याचेही रैनाने मान्य केले.
खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेत निर्धारीत २० षटकांमध्ये फक्त १३२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने १६.५ षटकांमध्ये ६ गडी राखत विजय मिळवला होता.
धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईचे नेतृत्व करणाऱ्या रैनाने धोनीबद्दल बोलताना सांगितले की, धोनी आता पूर्णपणे फिट असून पुढील सामन्यात तो खेळू शकणार आहे